आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवानी रांगोळेचं नवं मिशन:‘सांग तू आहेस का’ मालिकेतील भूमिकेसाठी शिवानी शिकतेय दुचाकी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे.

या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दुचाकीवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी दुचाकी चालवायला शिकायचं ठरवलं. सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली.’

हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. ही नवी मालिका येत्या 7 डिसेंबरपासून रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser