आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

न्यू नॉर्मलचा स्वीकार:'डॉक्टर डॉन'च्या सेटवर रोहिणी हट्टंगडींना मिस करतेय श्वेता, यामुळे चित्रीकरणात सहभागी होऊ शकत नाहीये रोहिणी हट्टंगडी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्याची परवानगी नाहीये.

अभिनेत्री श्वेता शिंदे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना खूप मिस करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, चित्रीकरणासाठी नवी नियमावली अंमलात आणण्यात आली आहे. या नियमावलीमुळे 65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्याची परवानगी नाही . त्यामुळेच रोहिणी हट्टंगडी 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या सेटवर उपस्थित राहू शकत नाहीत. 'झी युवा' वाहिनीवरील या मालिकेत, डॉक्टर मोनिका, त्यांची आई डॉक्टर स्नेहलता यांना खूप मिस करत आहेत, असे दाखवण्यात येत आहे.

याविषयी बोलताना, मोनिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणते की, खरंतर मी देखील रोहिणीजींना सेटवर मिस करत आहे. त्या मनाने सर्वात तरुण अभिनेत्री आहेत. मात्र या नव्या नियमानुसार त्या सेटवर येऊ शकत नाहीत. व्हिडीओ कॉल वरून आम्ही एकमेकांच्या टचमध्ये आहोत, असे श्वेताने सांगितले.

रोहिणी हट्टंगडी या सेटवर नेहमीच प्रसन्न आणि उत्साही असल्याचे पहिले जात होते. म्हणूनच, केवळ या नव्या नियमामुळे त्यांना चित्रीकरणात सहभागी होता येत नसल्याने, सेटवर त्यांना सगळेच खूप मिस करत आहेत. लवकरात लवकर कोरोनाचे संकट टळावे आणि सर्व काही सुरळीत व्हावे अशी इच्छा श्वेता शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जेणेकरून, मनाने चिरतरुण असणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करता येईल आणि चित्रीकरणादरम्यान भरपूर धमाल सुद्धा करता येईल.