आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जंगी बर्थडे सेलिब्रेशन:'डॉक्टर डॉन'च्या सेटवर झाले श्वेता शिंदेचे बर्थडे सेलिब्रेशन, पोस्ट शेअर करत म्हणाली....

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकताच श्वेताचा वाढदिवस झाला.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेतील डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

प्रेक्षकांच्या लाडक्या डॉली बाई म्हणजे श्वेताचा नुकताच वाढदिवस झाला. प्रेक्षक चाहत्यांनी तर श्वेतावर शुभेच्छांचा वर्षाव केलाच पण तिच्या सहकलाकारांनी आणि टीमने तिला खूप सारे सरप्राइजेस देखील दिले. केक, गिफ्ट्स आणि फुलं या सगळ्यामुळे श्वेताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, तिच्या स्मितहास्यातुन तिचा आनंद झळकतोय.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेताने सगळ्यांचे आभार मानले आहेत. तिचे सहकारी, सहकलाकार आणि टीमचं तिच्यावर असलेलं प्रेम पाहून ती भारावून गेली. श्वेताने सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि अशा लोकांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली यासाठी ती स्वतःला खूप भाग्यवान समजते असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

बातम्या आणखी आहेत...