आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिताच्या मुलीचे बारसे:अभिनेत्री स्मिता तांबे आणि धीरेंद्र यांनी लाडक्या लेकीचे नाव ठेवले वैदिका, अभिनेत्री जितेंद्र जोशीने मायलेकींसाठी शेअर केली सुंदर पोस्ट

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता जितेंद्र जोशीने शेअर केली सुंदर पोस्ट

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता नुकताच तिने पती धीरेंद्र द्विवेदी आणि लाडक्या लेकीसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'आईवडील म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार,' असे स्मिताने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

मुलीचे नाव ठेवले वैदिका
स्मिता आणि धीरेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव वैदिका असे ठेवले आहे. वैदिका या नावाचा अर्थ बुद्धीची देवता असा होतो. हे नाव माझ्या नव-याने धीरेंद्र यांनी ठेवले असल्याची माहिती स्मिताने दिली आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीने शेअर केली सुंदर पोस्ट
दरम्यान, अभिनेता जितेंद्र जोशीने एक सुंदर पोस्ट स्मिता आणि तिच्या लेकीसाठी शेअर केली आहे. जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'प्रिय स्मिता, आजवरच्या तुझ्या आयुष्यात तू जे काही पाहिलंस, काम केलंस, अनुभव घेतलास त्या सर्व गोष्टी करताना तू ठामपणे स्वतः सोबत उभी राहिलीस. तुझ्यासोबत हमिदाबाईची कोठी नाटकात काम करताना मी तुला कधीही सांगू शकलो नाही की तू किती प्रामाणिक आणि मेहनती नटी आहेस. आपली घट्ट मैत्री वगैरे नाही; ना आपण कधी तासनतास गप्पा मारल्या परंतु तुझं काहीतरी चांगलं होवो आणि तुला तुझ्या आयुष्यात सुख लाभो ही इच्छा माझ्या मनात होती. तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिका सोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं. तुझ्या पुढच्या वैवाहिक, व्यावसायिक , सामाजिक आयुष्यात तुला भरभरून सुख आणि यश मिळो ही प्रार्थना...'

या पोस्टच्या शेवटी जितेंद्रने लिहिले, 'सुमित्रा भावेंच्या एका शॉर्टफिल्म मध्ये एक स्त्री गर्भार राहते तेव्हा तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं अशी कल्पना करून एक छोटी कविता लिहिली होती ती तुला आणि वैदिकाला अर्पण.' असे नमूद करत खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे....

"तुला येतं का ऐकू मी हसताना सांग कूस बदलून ऊर समजतो का मी पळताना सांग पाय हलवून

तुला कळतं का घर येई ओठी थर थर बेंबी तून भरभर लाल लाल सरसर पोटा आत तुझं पोट सुद्धा भरतं का सांग गुदगुल्या करून

माझा जीव तुझा श्वास माझे डोळे तुझी आस माझी जीभ तुझी चव चल झोप आता बास डोळ्या आत डोळे गात स्वप्नं पडतं का सांग स्वप्नात येऊन"

स्मिता आणि धीरेंद्र द्विदेवी यांचे 18 जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले. अलीकडेच ती छोट्या पडद्यावर ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत झळकली होती. ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘72 मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ या मराठी चित्रपटांमध्ये स्मिताने काम केले. याच बरोबर ती ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली होती. तर तिचा नवरा धीरेंद्र नाट्य कलाकार आहे.

बातम्या आणखी आहेत...