आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वारंटाईनच्या काळात:अभिनेत्री स्मिता तांबे बालपणीच्या आठवणीत रमली, शेअर केल्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला.

पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, " माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे."

पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, "आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलचं आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात. ह्या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळं आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढूयात."

बातम्या आणखी आहेत...