आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तम आरोग्य ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच बसावं लागत असल्यामुळे अनेकांच्या फिटनेसवर परिणाम झालेला दिसला. अर्थात, घरी राहूनही फिटनेसची काळजी घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. घरच्या घरी व्यायाम आणि डाएटचा फंडा वापरून, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेची परीक्षक आणि लाखो तरुणांच्या दिलाची धडकन असलेली सोनाली कुलकर्णी ही सध्या तिच्या होणारा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये राहत आहे. दुबईमध्येच तिचा नुकताच साखरपुडा झाला.
सोनालीने दुबईत राहूनच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर प्रणितचे फेमस 37 दिवस फिटनेस चॅलेंज स्वीकारलं होतं. 37 दिवसांच्या या फिटनेस चॅलेंजच्या काळात, व्हिडीओकॉलच्या माध्यमातून प्रणितच्या संपर्कात राहून तिने नियमित डाएट आणि वर्कआऊट केलं. या 37 दिवसांच्या काळात ती दिवसातून 4 तास वर्कआऊट करत होती. एवढंच नाही, तर या दिवसांमध्ये तिने साखरेचे सेवनसुद्धा बंद केले होते. सकाळच्या वेळेत रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्यावर तिने भर दिला. अर्थात, जिम बंद असल्यामुळे आणि व्यायामासाठी घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, घरच्याघरीच वर्कआऊट करावे लागत होते.
View this post on InstagramA post shared by Pranit Shilimkar (@fitnesstalks_with_pranit) on Jun 16, 2020 at 9:31am PDT
या सर्व मेहनतीमध्ये सोनालीचा भावी पती कुणालसुद्धा सहभागी होता. दोघांनी जोडीने मिळून प्रणितचे फिटनेस चॅलेंज पूर्ण केले. या अनोख्या चॅलेंजबद्दल सोनालीने सांगितलं, "युवा डान्सिंगचे शूट सुरु असताना मला प्रणितचा कॉल आला होता, मात्र तेव्हा कामाच्या वेळेअभावी मला ते जमलं नाही. लॉकडाऊनमध्ये माझ्या वाढदिवसानिम्मित प्रणित ने हे चॅलेंज मला गिफ्ट केलं. रोज व्हिडीओकॉलच्या माध्यमातून प्रणितच्या संपर्कात राहणे सोपे होते. मी करत असलेले वर्कआऊट योग्य आहे की नाही, याकडे लक्ष देणे, योग्य त्या सूचना करणे, यासाठी व्हिडीओकॉलचा प्रभावी वापर केला गेला. टेक्नॉलॉजीचा वापर करून फिट राहण्याचा हा फंडा मला खूप आवडला. योग्य वर्कआऊट आणि साखरेविना असलेले डाएट, याचा परिणाम म्हणून, माझा लॉकडाऊनच्या काळातही फिटनेस उत्तम झाला आहे. हा फिटनेस क्लास प्रणित च्या मार्गदर्शनाखाली मी पुढेही सुरु ठेवीन', असे सोनालीने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.