आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फ्रिक:स्वतःला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची योगाला पसंती, बघा फोटो

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दापोलीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात ती योगा करताना ती दिसली.

लोकं निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात, पण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही स्वतःची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी भारतीय पारंपरिक योगा करणे जास्त पसंत करते. काही दिवसांपूर्वी दापोलीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात ती योगा करताना ती दिसली.

तेजस्विनी लोणारी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती फारशा सिनेमांमधून दिसलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिची फारच क्रेझ सध्या दिसते.

तेजस्विनीने आपल्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली होती. त्यानंतर तिने मराठी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' या चित्रपटात ती मकरंद अनासपुरेसोबत सोबत झळकली होती.

तेजस्विनीने साम दाम दंड भेद, गुलदस्ता, बर्नी, चिनू, नो प्रॉब्लेम, वाँटेड बायको नं. 1, मधू इथे आणि चौघुले तिथे, बाप रे बाप डोक्याला ताप यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

मराठी चित्रपटांसोबतच तेजस्विनी हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. चित्तोड की राणी पद्मिनी का जौहर ही तिची गाजलेली हिंदी मालिका आहे.

तेजस्विनीने आपले शिक्षण हे फिल्म मेकिंगमधूनच पूर्ण केले आहे. एम. ए केल्यानंतर तेजस्विनीने बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग अॅण्ड टेलिव्हिजनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...