आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनीचा कारनामा:स्वतःला गिफ्ट केली लग्झरी कार, म्हणाली - आता नुसता प्रवास नाही करायचा.. आता प्रवासाची मज्जा लुटायची...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट, मालिका, वेब सिरीजमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्या कुटुंबात नवीन सदस्याची एंट्री झाली आहे. तिने नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी तेजस्विनीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने स्वतःला लग्झरी कार गिफ्ट केली आहे.

आपल्या आवडत्या कारसोबतचे फोटो शेअर करत तेजस्विनीने एक पोस्टदेखील लिहिली आहे. ती म्हणते, गणपती बाप्पा मोरया... माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय... माझी स्वतःची नवीन कार.... माझ्यासाठी कार ही कधीच लग्झरी नव्हती, necessity होती... पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले यासाठी आता मनात फक्त कृतज्ञता आहे."

पुढे ती म्हणते, "आजपर्यंत खूप प्रवास केला... पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं.. आता नुसता प्रवास नाही करायचा.. आता प्रवासाची "मज्जा लुटायची..."

आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा "बाबा"... तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं... असे तेजस्विनी म्हणाली आहे. तेजस्विनीने महिंद्राची xuv 700 ही कार खरेदी केली आहे. ही कार 13.18 लाख ते 24.58 लाखांच्या घरात बाजारात उपलब्ध आहे.

अभिनेत्रीसोबतच निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे तेजस्विनी
तेजस्विनी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. अभिज्ञा भावेसोबत मिळून तिने तेजाज्ञा हा साड्यांचा ब्रॅँड सुरु केला आहे. इतकेच नाही तर याचवर्षी मे महिन्यात तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. 'क्रिएटिव्ह वाइब'च्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले 'क्रिएटिव्ह वाइब' मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईस्थित व्यावसायिक असून त्यांनाही कलेची प्रचंड आवड आहे. ‘क्रिएटिव्ह वाइब' अंतर्गत चित्रपट, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...