आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनीने हे फोटोशूट केले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने फोटोशूटच्या माध्यमातून जगभरातल्या कोरोना योद्धा डॉक्टरांना, त्यांच्यामधल्या 'दैवी' रूपाला सलाम केले आहे.
''दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला...
अन् मग मी सोडून त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला...
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस...'' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on InstagramA post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on Oct 16, 2020 at 10:06pm PDT
नवरात्रौत्सव स्पेशल फोटोशूटचे हे चौथे वर्ष
नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केला आहे. असे फोटोशूट करण्याचे तेजस्विनीचे हे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा, असे मनात नव्हते असे तेजस्विनीने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होते आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केले होते, असे तिने सांगितले.
दुस-या वर्षी प्रत्येक दिवसाचे वेगवेगळ्या नऊ देवींचे महात्म्य तेजस्विनीने फोटोशूटव्दारे मांडले होते. तर मागील वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर तिने भाष्य केले होते.
तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली आहे. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली, असे म्हणायला हरकत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.