आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी मराठी अवॉर्ड्स 2021:बांदेकर भावोजींनी कतरिनाचं केलं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन केला सन्मान

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.

महाराष्ट्राचं महावस्त्र 'पैठणी' देऊन आदेश बांदेकर यांनी 'होम-मिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे गेली 17 वर्षे तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरिना कैफ आहे.

हो हे खरं आहे. कतरिनाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरातील तिच्या चाहत्यांना भुरळ पडली आहे. नुकताच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली, त्यावेळी भावोजींनी कतरिनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं.

इतका मोठा सन्मान दिल्याने त्या क्षणी कतरीना भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून जातो. हा सोहळा आणि हा सन्मान क्षण प्रेक्षकांना शनिवार 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...