आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार प्रवाहवर 31 जानेवारीपासून सुरु झालेल्या ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो बंटी हे पात्र साकारणार असून या भूमिकासाठी तो खूपच उत्सुक आहे. बंटी हा पिंकीचा अगदी जवळचा मित्र... पहिल्यांदा मैत्री आणि कालांतराने एकतर्फी प्रेम करणारा मस्तमौला तरुण.
या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, ‘बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या ते मला समजावलं आहे. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय. स्टार प्रवाहसोबत याआधी छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल.’
आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.