आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे आदिनाथ कोठारे:ऑनस्क्रीन 'शुभमंगल..'चे शुटिंग अन् ऑफस्क्रीन स्वतःच्या शुभमंगलची तयारी, इंट्रेस्टिंग आहे आदिनाथ-उर्मिलाची लव्ह स्टोरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक आदिनाथ कोठारे याचा आज वाढदिवस आहे. आदिनाथने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. आदिनाथ आणि त्याची पत्नी उर्मिला मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला आता दहा वर्षे होत आली आहेत. चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. 'शुभमंगल सावधान'च्या सेटवर एकीकडे शुटिंग सुरू होते आणि दुसरीकडे आदिनाथ आणि उर्मिला आपल्या शुभमंगलची तयारी करत होते. आदिनाथच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया या दोघांच्या लव्ह स्टोरीविषयी...

उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाच्या तयारीत होते. या चित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे.

एका मुलाखतीत उर्मिलाने आदिनाथसोबतच्या भेटीविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, “शुभमंगल सावधानच्या सेटवर आम्ही भेटलो. माझी नायिका म्हणून ती पहिली फिल्म होती आणि आदिनाथ त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होता. सेटवर ओळख झाली. त्याचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. चित्रपट पूर्ण झाल्यावरही आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आम्ही एकमेकांना बरीच वर्षे डेट केल्यावर मग 20 डिसेंबर 2011 ला विवाहबध्द झालो. लग्न छानपैकी तीन-चार दिवसांचं होतं. मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टी, हळद, वैदिकपध्दतीने गोरज मुहूर्तावर लग्न असं साग्रसंगीत लग्न झालं. लग्नात मी नऊवारी साडी आणि मराठी शृंगार घातला होता.”

आदिनाथ आपल्या प्रेमात पडण्याच्या गुलाबी क्षणांविषयी सांगतो, “शुभमंगल सावधानच्या चित्रीकरणावेळी हळूहळू आमची मनं जुळायला लागली. आम्ही एकमेकांशी आपल्या भावना डोळ्यांतूनच बोललो होतो. त्यामुळे मी तिला फॉर्मली प्रपोज केलं नाही. आमचं ट्युनिंग अगदी पहिल्या दिवसापासून जुळलं होतं."

लग्नाअगोदरची गर्लफ्रेंड लग्नानंतर खुप बदलते, असं प्रत्येक पुरूषाला वाटतं. आदिनाथचंही तेच मतं आहे. याविषयी त्याने सांगितले होते, “लग्नाअगोदर उर्मिला खूप रिझर्व्हड होती. आता ती खूप आउटस्पोकन, सोशलाइट आणि पार्टी स्टॉपर झालीय.“

याविषयी उर्मिला सांगते, “लग्नाअगोदर माझ्याही मनात आदिनाथची क्युट, स्विटस्पोकन अशी प्रतिमा होती. पण लग्नानंतर जाणवलं, आदिनाथ खूप विक्षिप्त आहे. तो ब-याचदा आपल्याच एका दुनियेत असतो. अगदी मी त्याच्या शेजारी जरी उभी असेन तरी त्याला जोरात हाक मारून त्याचं लक्ष वेधुन घ्यावं लागतं. तेव्हा कुठे तो त्याच्या विचारातून बाहेर पडतो. पण तो खूप क्रिएटीव्ह आहे. त्यामुळे असं होतं. हे सगळ्याच क्रिएटीव्ह माणसांचं होतं. मी ह्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहते. मी ही लग्नानंतर त्याच्यासारखी वेडी झालीय. त्याच्यासारखीच कधीतरी वागते.”

लग्नाच्या सहा वर्षांनी झाले आईबाब
लग्नाच्या सहा वर्षांनी उर्मिला आणि आदिनाथ एका गोंडस मुलीचे आईबाबा झाला. जीजा हे त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव आहे. 18 जानेवारी 2018 रोजी जीजाचा जन्म झाला.

बातम्या आणखी आहेत...