आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'दगडी चाळ २'ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे.
त्याचबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ 2'मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की.
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे तर अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने 'डॅडीं'ची साथ सोडली की, अजूनही सूर्या 'डॅडीं'चा उजवा हात आहे? हे 'दगडी चाळ 2' पाहिल्यावरच कळेल.
मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपटातील इतर कलाकारांविषयी, ज्याचा उलगडा लवकरच होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.