आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘कागर’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत डेब्यू केल्यावर आता अभिनेता शुभंकर तावडे पहिल्यांदाच रॉम-कॉम सिनेमात दिसणार आहे. शुभंकरच्या आगामी 'दिल दोस्ती दुनियादारी' या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच पुण्यात सुरू होतंय.
'काळे धंदे' या वेबसीरिजमुळे तरुणाईत चांगलाच प्रसिध्द असलेल्या शुभंकरने 'कागर' सिनेमा केल्यानंतर तर त्याचे अनेक चाहते त्याने एक रोमँटिक सिनेमा करावा अशी मागणी करत होते. आता या नव्या सिनेमामुळे त्याच्या चाहत्यांची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
लॉकडाऊननंतर सेटवर परतण्यास उत्साहित असलेला शुभंकर म्हणतो, ”लॉकडाऊननंतर सेटवर पोहोचण्यासाठी मी खूपच एक्सायटेड आहे. शुटिंग करतेवेळी आम्ही निश्चितच सगळ्या खबरदा-या घेणार आहोत. ‘न्यू नॉर्मल’साठी आता आम्ही मानसिकरित्या सज्ज झालो आहोत. सेटवर अगदी नेमकेच तंत्रज्ञ आणि कलाकार असतील. मात्र याचा परिणाम चित्रीकरणाच्या गुणवत्तेवर होणार नाही.”
भुमिकेविषयी विचारल्यावर शुभंकर म्हणतो, “मी या सिनेमात तरूण नावाच्या कवी, गायक आणि गिटारिस्ट मुलाच्या भूमिकेत तुम्हाला दिसेल. आपण रॉकस्टार बनावं असं तरूणचे स्वप्न असतं. आपले ही मोठमोठे स्टेज शो व्हावेत अशी त्याची इच्छा असते.”
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.