आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तुझं माझं जमतंय':पौराणिक, ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर आता रोशन विचारेच्या यंगस्टर्सच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता रोशन विचारे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

अश्विनी, शुभंकर आणि पम्मी ही छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतील पात्रं त्यांच्या अभिनयामुळे आणि मालिकेच्या कथेतील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे विशेष गाजत आहेत. अभिनेते- निर्माते स्वप्निल मुनोत यांची निर्मिती असलेल्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना गोष्टीशी आणि मालिकेशी जोडून ठेवतोय.

शुभंकरची भूमिका साकारणारा अभिनेता रोशन विचारे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. रोशन यामध्ये यंगस्टर्सची भूमिका करतोय. यापूर्वी तो ‘लक्ष्मी नारायण’ या पौराणिक मालिकेतील ‘नारायण’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत ‘शहाजी राजे भोसले’ यांची भूमिका साकारली होती.

प्रत्येक पात्रं अचूकपणे आणि मेहनतीने साकारण्याची रोशनची तयारी हा त्याचा कलाकार म्हणून विशेष गुण आहे. निर्माते स्वप्निल मुनोत यांनी देखील रोशनची ही कला जाणली आणि आज रोशनची ही नवी भूमिका अनेकांना आवडत आहे. तसेच सर्व कलाकारांच्या मेहनतीमुळे, टीम वर्कमुळे आणि प्रेक्षकांच्या पसंतीमुळे ‘तुझं माझं जमतंय’ने 50 हून अधिक एपिसोड्स पूर्ण केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...