आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता पुन्हा एकदा झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजनल 'गस्त' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि बाळ्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
'गस्त' या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिका निभावत असून अरबाज त्याच्या मित्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चोरी होत असल्यामुळे गस्त घातलेल्या एका गावात अमर आणि त्याची प्रेयसी सुजाता यांची प्रेमकथा पुढे नेण्यासाठी अमरचे मित्र त्याची मदत करत असतात. अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा एकत्र येणार म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार यात शंकाच नाही.
पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अरबाज म्हणाला, "पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करताना आम्हाला जुने दिवस आठवत आहेत. धमाल-मजा-मस्ती मध्ये गस्त या चित्रपटाचं शूटिंग केव्हा पूर्ण झालं हे आम्हाला कळलंच नाही. मी या चित्रपटात अमरचा मित्र चिन्याची भूमिका साकारतोय. अमर आणि चिन्या यांची जोडी बाळ्या आणि सल्या एवढीच प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.