आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात:सुबोध भावेनंतर आता अभिजीत केळकर, पौर्णिमा डे, जुईली जोगळेकर यांना कोरोनाची लागण, गायक रोहित राऊतची कोरोनावर मात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 ऑगस्टपासून 'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

सोनी मराठी वाहिनीवर ‘सिंगिंग स्टार- गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे’ हा रिअ‍ॅलिटी शोमध्ये अलीकडेच सुरु झाला आहे. मात्र आता पुढील दहा दिवसांसाठी या कार्यक्रमाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह सेटवरील सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अभिजीत आणि पौर्णिमा यांच्या व्यतिरिक्त गायिका जुईली जोगळेकर आणि दोघा क्रू मेम्बर्सना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. तर या शोमधील मेंटॉर आणि गायक रोहित राऊत यालादेखील कोरोना संसर्ग झाला होता. मात्र आता तो कोरोनामुक्त झाला आहे.

‘सिंगिंग स्टार’ शो मध्ये अभिजीत केळकर आणि पौर्णिमा डे हे स्पर्धक आहेत. तर गायक रोहित राऊत हा अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा मेंटॉर आहे. तर जुईली जोगळेकर ही अभिनेता अंशुमन विचारेची मेंटॉर आहे. एकुण सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सिंगिंग स्टार शोचे शूटिंग पुढील दहा दिवसांसाठी थांबवण्यात आल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

अभिजीत केळकरने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. “नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती. या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे. माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत” अशी पोस्ट अभिजीतने इंस्टाग्रामवर केली आहे.

  • 17 ऑगस्ट रोजी रोहित राऊतचा रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

या शोमधील गायक आणि स्वानंदी टिकेकरचा मेंटॉर रोहित राऊतची कोरोना चाचणी 17 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आली होती. पण आता कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः रोहितने इंस्टाग्रामवर एक पोस्टद्वारे सांगितले आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच क्वारंटाइन होतो आणि आता मी पुर्णपणे बरा झालोय, असे रोहित म्हणाला आहे.

अभिनेता सुबोध भावेचे घर देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. स्वतः सुबोधने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याच्यासह त्याच्या पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. सध्या हे तिघेही घरीच असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखील उपचार घेत आहेत.