आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीसिंगची नवी खेळी:अटकेनंतर अजितच्या डोक्यात शिजतोय नवीन डाव, खोटेपणाची अ'जीत' कहाणी आता देवीसिंग मांडणार कोर्टापुढे

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत 'किरण गायकवाड' याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिकली आहेत.

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये,या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत ह्यासाठी तो डिम्पलची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ACP दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं सांगते.

ह्यातच डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख पडलेय, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...