आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेअरवेल इट इज!!:'अग्गंबाई सासूबाई'चा निरोप घेताना भावूक झाला 'बबड्या', म्हणाला -  "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना अभिनेता आशुतोष पत्की भावूक झाला आहे.

'अग्गंबाई' सासूबाई या मालिकेचे कथानक आता नवीन वळण घेत असून मालिकेचे शीर्षकदेखील 'अग्गंबाई सूनबाई' असे बदलण्यात आले आहे. या नवीन कथानकात आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या भूमिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि गिरीश ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र मालिकेतील शुभ्रा आणि बबड्या उर्फ सोहमच्या भूमिकेत तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की दिसणार नाहीयेत. त्यांची जागा आता उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर यांनी घेतली आहे. या मालिकेचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना अभिनेता आशुतोष पत्की भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित, हे पाहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय असे म्हटले आहे.

आशुतोष लिहितो, "सोहम" ऊर्फ "बबड्या"... काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम 1 नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण "अग्गंबाई सासूबाई" was a big learning lesson... मराठी भाषेपासून, कलाकाराने camera समोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं... सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो, सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं या साठी I am very grateful. @zeemarathiofficial आणि आमचे producer @sunilvasantbhosale यांचा मी आभारी आहे की "सोहम" म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ..आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक🙏तुम्ही सुद्धा खूप प्रेम दिलंत.'

पुढे आशुतोष म्हणतो, 'हे पाहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय... खूप आठवण येईल सगळ्यांची पण "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"... लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करीन तुमच्या मनात घर करण्याचा.. wishing a great success to team "अग्गंबाई सूनबाई" I am sure u all will rock.'

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये अभिनेता आशुतोष पत्कीने सोहम उर्फ बबड्याची भूमिका साकारली होती आणि त्याची ही व्यक्तीरेखा कमालीची लोकप्रिय देखील ठरली होती. काहीशी खलनायकी असलेल्या या बबड्याच्या व्यक्तिरेखेला अनेकांनी शिव्या सुद्धा घातल्या. त्याचा राग सुद्धा केला. पण आता आशुतोषच्या जागी अद्वैत दादरकर ही भूमिका साकारणार आहे. येत्या 15 मार्चपासून मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्या आणखी आहेत...