लॉकडाऊन / ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आसावरी म्हणजेच निवेदिता सराफांसाठी घरातील 'ही' जागा आहे सर्वात स्पेशल  

  • निवेदिता यांचं घर 13व्या मजल्यावर आहे.

दिव्य मराठी

May 22,2020 07:52:00 PM IST

मुंबई. झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील सर्वांची लाडकी आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ लॉकडाऊनमध्ये घरी कसा वेळ घालवतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

लॉकडाऊनमुळे कलाकार देखील घरीच आहेत त्यामुळे त्यांच्या घरातील अशी एक जागा जिथे बसून वेळ कसा जातो हे कळत देखील नाही, अशा जागेबद्दल विचारलं असता अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी घराचं नूतनीकरण केलं, तेव्हा मुलाच्या बेडरूममधली गॅलरी मला हवा तशी बांधून घेतली होती. घर 13व्या मजल्यावर असल्यानं छान हवा येते. इथं बसून कॉफी पिणं आणि गाणी ऐकणं हे दोन माझे आवडते छंद आहेत."

X