आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठमोळे दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहिर झाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. अक्षय इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे 70 देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते.
‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारे अक्षय इंडीकर आपल्या स्वतंत्र व अनोख्या शैलीमुळे जगभरात नावाजले गेले आहेत. उदाहरणार्थ नेमाडेनंतर ‘त्रिज्या’ व ‘स्थलपुराण’ हे त्यांचे चित्रपट जगभारतल्या अत्यंत प्रतिष्ठित सिनेमहोत्सवात झळकले. स्थलपुराण हा चित्रपट बर्लीन आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शित झाला होता. शिवाय अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘त्रिज्या’ या चित्रपटाला लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.