आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थुकरटवाडीमध्येमध्ये पोहोचली 'सूर्यवंशी'ची टीम:'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर खिलाडी अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ करणार दंगा, अक्षयने उघड करणार एक खास सिक्रेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आले आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्याचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबायचं नाहीत. हे सर्व कलाकार त्यांचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.

तसेच डॉक्टर निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, ‘आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका. 'सुर्यवंशी’ची अ‍ॅक्शन आणि ‘चला हवा येऊ द्या’ ची कॉमेडी अ‍ॅक्शनच्या माध्यमाने अक्षयकुमार यांचा मराठमोळा अंदाज पहायला मिळणार आहे.

सोशल मीडियावर या विशेष एपिसोडमधील एक सीन देखील शेअर केला आहे. याची झलक पाहून प्रेक्षकांना हसणे आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की, येत्या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आपल्याला धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे.

या खास एपिसोडचे व्हिडिओ रिलीज करण्यात आले आहेत. यात डॉ. निलेश साबळे हा सूर्यवंशीच्या संपूर्ण टीमसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार हा जॅकी श्रॉफ यांच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. यावेळी निलेश साबळेने अक्षय कुमारला चित्रपटासह खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची अक्षयने चक्क मराठीत उत्तर दिली. यावेळी निलेश साबळेंने अक्षयला “तुम्ही इतकं उत्तम मराठी कसं काय बोलता? म्हणजे तुम्ही व्यवहारातील सर्वच शब्द उत्तम मराठी शब्द कसे काय बोलता? याचे नेमकं कनेक्शन काय?” असे प्रश्न विचारले. यावर अक्षयने हसत हसत उत्तर दिले.

अक्षय म्हणाला, 'फार वर्षापूर्वी माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती. मी तिच्या घरी जायचो. त्यामुळे मी शिकलो. तसेच जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असले तर हा सर्वात उत्तम मार्ग आहे,” असेही अक्षय गंमतीत म्हणाला.

येत्या 1, 2 आणि 3 नोव्हेंबरला हा भाग प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...