आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी सीझन 3:बिग बॉस मराठीच्या घरामधून अक्षय वाघमारे बाहेर तर आदिश वैद्यची झाली धमाकेदार एंट्री

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत... येथे अवघ्या बारा तेरा दिवसांमध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोन मध्ये होते आणि या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले.

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर अक्षयने घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “मी सर्वात जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस करेल. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये रहाण खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळलो.” बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आदिश वैद्यची एंट्री
प्रेक्षकांना रविवारच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एंट्री झाली. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये एंटर झाला. आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार ? की तो त्याचा गृप तयार करणार ? कि स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे

बातम्या आणखी आहेत...