आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणादा-पाठकबाई अडकले लग्नाच्या बेडीत:मराठमोळ्या पेहरावात दिसले अक्षया-हार्दिक; बघा कसा रंगला लग्नसोहळा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पुण्यात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली. दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नात दोघेही पारंपरिक रुपात अतिशय सुंदर दिसले. नऊवारीत अक्षयाचे सौंदर्य खुलून आले आहे.

बघा लग्नसोहळ्याचे खास फोटो...

अक्षयाने लग्नात राणी कलरची नऊवारी परिधान केली आहे. या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात ठुशी, चंद्रहार, नाकात नथ घातली आहे. या रुपात अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे.

हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा परिधान केला आहे. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे. गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे.

अक्षया आणि हार्दिकने मे 2022 मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता.

हार्दिक-अक्षयाच्या लग्नाला इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रमंडळींनीही हजेरी लावली आहे. पुण्यात शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा सुरू आहे.

अक्षया-हार्दिकच्या लग्नासंबंधित आणखी बातम्या वाचा येथे...

  • अक्षया-हार्दिकची संगीत सेरेमनी:एकत्र थिरकले नवरा-नवरी, मित्रमंडळींनीही परफॉर्मन्सने लावले चारचाँद

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मेंदी आणि हळदी समारंभानंतर गुरुवारी रात्री अक्षया-हार्दिकचा संगीत सोहळाही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्यातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अक्षया आणि हार्दिकच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी...

  • साता जन्माच्या गाठीत अडकले राणादा-पाठकबाई:लग्नानंतर नववधू अक्षयाची हार्दिकसाठ खास पोस्ट, म्हणाली - 'तुझ्यात जीव रंगला… कायमचा'

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत. अतिशय थाटामाटात दोघांचा विवाह संपन्न झाला. पुण्यात दोघे साता जन्माच्या गाठीत अडकले. या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. लग्नानंतर नववधू अक्षयाने लग्नाचे खास फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

या फोटोला अक्षयाने हटके कॅप्शन दिले आहे. 'रील ते रिअल… जादू कायम', असे कॅप्शन अक्षयाने फोटोला दिले आहे. सोबतच तिने #अहा असा हॅशटॅग शेअर करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. येथे वाचा सविस्तर...

  • अक्षया-हार्दिकचा बँड, बाजा, बारात:एकाच मांडवात वर-वधूला लागली हळद, जंगी झाला हळदीचा सोहळा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी आज साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सर्वच विधी मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. मेंदीसोहळ्यानंतर अक्षया आणि हार्दिकला एकाच मांडवात हळद लागली. या सोहळ्यासाठी सुंदर सजावट अशी सजावट करण्यात आली. या सोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी...

  • अक्षयाने खास नखांवर लिहून घेतली लग्नाची तारीख:'या' तारखेला हार्दिकसोबत होतेय विवाहबद्ध, करुन घेतले खास नेल आर्ट

अभिनेत्री अक्षया देवधर पुढच्या काही तासांत अभिनेता हार्दिक जोशीसोबत विवाहबद्ध होणार आहे. पण अद्याप अक्षयाच्या लग्नाची तारीख समोर आली नव्हती. आता अक्षयाने स्वतः तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे, पण ती देखील हटके अंदाजात... येथे वाचा सविस्तर बातमी...

  • अक्षयाच्या हातावर सजली हार्दिकच्या नावाची मेंदी:नव-या मुलीने हातावर लिहिल्या सप्तपदी, बघा सेरेमनीची PHOTO आणि VIDEO

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहोचली अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान दोघांच्या घरीही लगीनघाई बघायला मिळतेय. बुधवारी अक्षयाच्या हातावर हार्दिकच्या नावाची मेंदी सजली तर नव-या मुलाला हळद लागली. आता अक्षयाच्या मेंदी सेरेमनीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी...

  • आली समीप लग्नघटिका!:अक्षयाच्या हातावर सजली मेंदी, हार्दिक जोशीला लागली हळद; लग्नघरातील व्हिडिओ आले समोर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोघे आता ख-या आयुष्यात साता जन्माच्या गाठीत अडकणार आहेत. सध्या हार्दिक आणि अक्षया यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. ग्रहमखपासून अक्षयाच्या घरी लग्नविधींना सुरूवात झाली. आता अक्षय आणि हार्दिकने त्यांच्या लग्नविधींचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी...

  • राणादा-अंजलीबाईच्या लग्नविधींना सुरुवात:अक्षयाच्या घरी पार पडली ग्रहमख पूजा, हार्दिकच्या घरी झाले केळवण

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले राणादा आणि अंजली बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. येत्या 1 किंवा 2 डिसेंबर रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्याघरी सुरू असणाऱ्या विधींचेही फोटो समोर आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी...

बातम्या आणखी आहेत...