आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षया-हार्दिकच्या लग्नाला एक महिना पूर्ण:वेडिंग व्हिडिओ शेअर करत हार्दिक म्हणाला - तिने हो म्हणायला सहा महिने लावले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. ही रील लाइफ जोडी महिन्याभरापूर्वी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी साता जन्माच्या गाठीत अडकली. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघांनीही त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाबाबत सांगितले आहे. या व्हिडिओत मेंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळ्याची सुंदर झलक लक्ष वेधून घेतेय.

या व्हिडिओमध्ये अक्षयाने आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. अक्षया म्हणते, "मला समोरच्याच मनात काय सुरू असेल, याबाबत पुसटशी कल्पना येत असते. त्याने काय घडतंय किंवा समोरचा काय बोलणार आहे, याचा अंदाज येतोच. पण आता हार्दिक असे काही बोलेल किंवा लग्नासाठी विचारेल असे मला वाटलं नव्हते. आधी मी यासाठी तयार नव्हते. त्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. पण मलाही माहीत होते की मी हो म्हणणार आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडले", असे अक्षया म्हणाली.

बघा अक्षया आणि हार्दिक यांनी शेअर केलेला त्यांचा वेडिंग व्हिडिओ...

अक्षयाने होकार द्यायला घेतला सहा महिन्यांचा वेळ
हार्दिकनेही अक्षयासोबतची लव्ह स्टोरी सांगितली आहे. तो म्हणाला, "मालिका संपल्यानंतर लग्नाचे वय झाले आहे, असे मला घरुन सांगण्यात आले. अक्षयाला लग्नासाठी विचार, असे आई म्हणाली. त्यामुळे आमच्या लग्नाचे क्रेडिट माझ्या आईला जाते. मी प्रपोज केल्यानंतर अक्षयाने लगेच उत्तर दिले नाही. तिने सहा महिन्यांचा वेळ घेतला. मालिका संपल्यानंतर आमचा जीव रंगला." अक्षयाने हो म्हटल्यानंतर तिच्या आईकडून थेट साखरपुडा आणि लग्नाच्या तारखाच आल्याचे हार्दिकने यावेळी सांगितले.

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेतले महालक्ष्मीचे दर्शन
अक्षया आणि हार्दिकने लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवाचे आशीर्वाद घेतले. या दोघांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतले. हार्दिकने मंदिरातील दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी दोघांचाही पारंपरिक लूक पाहायला मिळाला. हार्दिकने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर अक्षयानेही त्याच रंगाचा ड्रेस घातला होता.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 2 डिसेंबर रोजी झालेल्या या शाही विवाहसोहळ्याची बरीच चर्चा रंगली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...