आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इट्स सेलिब्रेशन टाइम:'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'ने गाठला 300 भागांचा टप्पा, सेटवर झाले सेलिब्रेशन

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहता पाहता या मालिकेने 300 भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

झी युवावरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. यातच सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण कॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांची दमछाक होतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने 300 भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

नुकतंच या मालिकेच्या 300 व्या भागाचं प्रक्षेपण झालं आणि हा आनंद कलाकारांनी सेटवर साजरा केला. या मालिकेतील अप्पा म्हणजेच अभिनेता सुनील गोडबोले या आनंदाच्या क्षणी म्हणाले, "प्रेक्षकांचं अविरत प्रेम आणि पाठिंब्यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने 300 मालिकांचा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी आजवर या मालिकेला जो प्रतिसाद दिला असाच पुढेही ते राहतील याची मला खात्री आहे."