आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलीवर्ल्ड अपडेट:हे आहेत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील 'ट्रबल-मेकर्स', अभिनेत्री गौरी कुलकर्णीने शेअर केला फोटो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नचिकेतच्या आईच्या एंट्रीनंतर मालिकेत नवीन वळण आलं आहे.

छोट्या पडद्यावरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेमधले नचिकेत आणि सई चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, नचिकेतची आई आणि सई मधील मतभेत, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार तसंच अप्पा आणि नचिकेतच्या आई मधील वाद पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत.

नचिकेतच्या आईच्या एंट्रीनंतर मालिकेत नवीन वळण आलं आहे. सईचं जाई जोशी बनून नचिकेतच्या आईला इम्प्रेस करणं, नचिकेतच्या आईने जाई आणि नचिकेतच्या लग्नाची घोषणा करणं या सगळ्यामुळे मालिकेतील गुंता वाढला आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहेत अप्पा, नचिकेतची आई, सई आणि नचिकेत. ऑनस्क्रीन जरी या व्यक्तिरेखांमध्ये वाद आणि मतभेद असले तरी ऑफस्क्रीन यांची धमाल चालू असते.

सई म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने 'द ट्रबल मेकर्स' असं म्हणत एक झकास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहे. जरी मालिकेत हे कलाकार ट्रबल-मेकर्स असले तरी ते प्रेक्षकांच्या मनोरंजनात मात्र भर पाडत आहेत यात काहीच शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...