आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:कला, संस्कृती जपणारे अंबाजोगाईचे साहित्य संमेलन

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या अंबाजोगाई शहरात स्थानिकांच्या पाठबळावर १० वे अंबाजोगाई साहित्य संमेलन सुरू झाले. लोकसहभागातून होणाऱ्या या बहुभाषिक आणि गावस्तरीय संमेलनाची सुरुवात २५ वर्षांपूर्वी झाली होती. आजही शहरातील साहित्यप्रेमींकडून १०० रुपये स्वागत शुल्क जमा करत रसिकांच्या राजाश्रयावरच हे साहित्य संमेलन पार पडत आहे.

२५ वर्षांपूर्वी साहित्य, कला व संस्कृती जतन व्हावी, यासाठी अंबाजोगाई साहित्य संमेलनाची सुरुवात लोकसहभागातून झाली. सन १९९६ साली प्रा.रंगनाथ तिवारी, डॉ.श्रीहरी नागरगोजे, प्रा.नानासाहेब गाठाळ आणि अमर हबीब या चौघांनी हे संमेलन घेण्याचा नवा पायंडा सुरू केला. तो आजही कायम आहे. प्रारंभी प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये चौघांचे जमा केले होते. डॉ. श्रीहरी नागरगोजे यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले व प्रा.रंगनाथ तिवारी हे संमेलनाध्यक्ष होते. राम मुकदम, डॉ. संतोष मुळावकर, गणपत व्यास, भालचंद्र मोटेगावकर आदींनी परिश्रम घेतले.

संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. दासू वैद्य
यंदा १९, २० व २१ ऑगस्ट २०२२ रोजी मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईचे हे दहावे अंबाजोगाई साहित्य संमेलन होत आहे. या वेळी “अनिवासी अंबाजोगाईकर” या संकल्पनेवर संमेलन पार पडत आहे. प्रा.डॉ.दासू वैद्य हे संमेलनाध्यक्ष ,तर प्राचार्य डॉ. बी.आय.खडकभावी हे स्वागताध्यक्ष आहेत. प्रत्येक पिढीतील साहित्यिकांनी येथील परंपरा ,संस्कृती, साहित्य जपण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजही संमेलनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...