आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज डेट जाहीर:'या' दिवशी झोंबिवलीतील लॉकडाऊन उठवण्यात येत आहे..! झोंबिवलीत रंगणार अमेय, ललित, वैदेहीचा कल्ला

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 4 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रेक्षकांचं आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. येत्या 4 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी आपल्या अनोख्या अंदाजात चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करत पोस्टर लाँच केले आहे.

अ‍ॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन आहेत. आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते.

ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत... पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव 'झोंबिवली' असे आहे. युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते 'झोंबिवली' हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.

Lawrence D’Cunha हे सिनेमाचे डिओपी आहेत तर साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे लेखक आहेत. एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. सिनेमाचा नविन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार हे नक्की. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये प्रेक्षकांना मिळेल.

बातम्या आणखी आहेत...