आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची खरंच प्लास्टिक सर्जरी झालीये का!:मिसेस उपमुख्यमंत्र्यांना सवाल; अमृता म्हणाल्या - 'मला ट्रोल केले गेले पण…'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवर नव्यानेच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. कार्यक्रमाच्या मागील भागात सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता या भागात आपल्या गाण्यांनी आणि वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत. सुबोध भावे आणि महिला मंडळ हे अमृता फडणवीसांचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत. या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि त्यांनीही तेवढ्याच खुमासदार अशी उत्तरे दिली आहेत.

या कार्यक्रमात अमृता फडणवीस ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली की त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मजेदार उत्तर दिली.

इतकेच नाही तर कार्यक्रमातील महिला मंडळाने अमृता यांना "तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?" असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "चांगले झाले की तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोलदेखील केले आहे. पण प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते. याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा तुमचा चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचणी निर्माण होतात."

पुढे बोलताना अमृता यांनी सांगितले की, त्या लग्नाआधी कधीही ब्युटी पार्लरला गेल्या नाहीत. त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच त्यांनी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात, असे अमृता यावेळी म्हणाल्या.

यावेळी महिला मंडळाने त्यांना गळ्यात मंगळसूत्र का घातले नाही, असादेखील प्रश्न विचारला. त्याचेही फारच खुमासदारपणे त्यांनी उत्तर दिले. पुढच्या सहप्रवासी या प्रसंगात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राग व्यक्त करून "आसामला नेणार का?" अशीही विचारणा केली असताना सर्वाना खळखळून हसवले.

बातम्या आणखी आहेत...