आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे:साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते अमृता खानविलकर, बघा बर्थडे गर्लच्या या दिलखेचक अदा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृताचा आज वाढदिवस आहे.

मराठी इंडस्ट्रीतील गॉर्जिअस अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. मराठीतील देखण्या अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे. साडीत ती जेवढी सोज्वळ दिसते तितकीच वेस्टर्न आउटफिटमध्ये चाहत्यांना हॉट वाटते.

इंडियन आणि वेस्टर्न असे दोन्ही आउटफिट ती उत्कृष्टरित्या कॅरी करते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, अमृताने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली साडीतील काही खास छायाचित्रे. या छायाचित्रावरुन तुमची नजरच हटणार नाही.

23 नोव्हेंबर 1984 रोजी तिचा जन्म झाला. अमृताचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले.

अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर कार्यक्रमांमध्ये तिने सूत्रसंचालनही केले आहे. अमृताला एक थोरली बहीण आहे. अमृताचे लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत झाले आहे. लग्नानंतरही अमृताने काम सुरु ठेवले आहे.

‘गोलमाल’, ‘साडे माडे तीन’, ‘गैर’, ‘अर्जुन’, 'झकास', 'सतरंगी रे', 'शाळा', ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, 'वन वे टिकिट' यासह अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये अमृताने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अमृताने ओळख निर्माण केली आहे. ‘फुंक’ , ‘फुंक 2’, ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’, 'मलंग' या चित्रपटांध्ये ती झळकली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser