आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन ट्रीट:अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णीचा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित, हे आहे चित्रपटाचे नाव... 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • "परिणती" हा मराठी चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

कोविड 19 व्हायरसमुळे संपूर्ण देश बंदिस्त आहे. त्यामुळे प्रत्येकजण भविष्य आणि वर्तमान काळाचा विचार करत आहेत. या व्हायरसमुळे मराठी चित्रपटसृष्टी देखील बंद आहे. पण आता बॉलिवूडनंतर मराठी चित्रपट निर्मातेदेखील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थेट ओटीटीकडे वळणार असे चित्र आहे. अमृता सुभाष आणि सोनाली कुलकरणी यांची महत्त्वाची भूमिका असलेला  ‘परिणती’ हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याविषयी निर्णय घेतले जात आहेत.

याविषयी चित्रपटाचे निर्माता पराग मेहता म्हणाले, “बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले पाऊल टाकले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बाजारातील सामान्य परिस्थिती अशी आहे की प्रादेशिक चित्रपटांना सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागेल. कारण आपल्याला काही प्रमाणात टिकून राहावे लागणार आहे आणि त्याकरिता आपल्या प्रेक्षकांना चांगली सामग्रीदेखील द्यावी लागेल. आमच्यासमोर हा एक पर्याय होता आणि डिजिटल उत्क्रांतीचा उदय म्हणून एखाद्याला पुढाकार घ्यावा लागणारच होता आणि मी तो घेतला आहे.” 

ते पुढे म्हणाले की, आम्ही काहींशी चर्चेत आहोत आणि आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि चित्रपट प्रर्दशित करण्याची घोषणा लवकरच केली जाईल.

अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णीसह अक्षर कोठारीची मुख्य भूमिका असलेला "परिणती" हा ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाद्वारे अक्षय बालसराफ दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. 

बातम्या आणखी आहेत...