आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीस यांना सासूबाई ओरडत नाहीत का...:गळ्यात नव्हे तर हातात मंगळसूत्र घालतात अमृता, स्वतः सांगितले कारण

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका अमृता फडणवीस यांनी नुकतीच झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात पुन्हा एकदा त्यांचा बिनधास्त अंदाज सगळ्यांना बघायला लावला. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावे आणि महिला मंडळाने त्यांना एकापेक्षा एक प्रश्ने विचारली आणि अमृता यांनीही त्यांना खुमासदार शैलीत उत्तरे दिली.

यावेळी महिला मंडळाने अमृता यांना तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालत नाही, तर तुम्हाला तुमच्या सासूबाई ओरडत नाही का, असा प्रश्न विचारला. त्यावर अमृता यांनी उत्तर देताना म्हटले, पतीने गळा पकडण्यापेक्षा आपला हातात हात पकडावा म्हणून हातात मंगळसूत्र घालते असे उत्तर दिले. हातात मंगळसूत्र घातल्याने देवेंद्रजींनी सतत माझा हात पकडलाय अशी सतत फिलींग येते, असे त्या म्हणाल्या. त्यावर टाळ्यांचा एकच कडकडात झाला.

या कार्यक्रमात अमृता फडणवीस ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली कि त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. सहप्रवासी या प्रसंगात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राग व्यक्त करून "आसामला नेणार का?" अशीही विचारणा त्यांनी केली.

हेही वाचा -

बातम्या आणखी आहेत...