आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीस यांची कोपरखळी:'जिनको आना था वो आए ही नहीं...', राजकीय घडामोडींवर व्यक्त झाल्या अमृता

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस लवकरच झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. झी मराठीने या कार्यक्रमाचे काही प्रोमो रिलीज केले आहेत. यापैकी एका प्रोमोत अमृता अप्रत्यक्षरित्या टोलेबाजी करताना दिसल्या.

झाले असे की, कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना सुबोध भावे आणि महिला मंडळाने राजकीय घटनांसह खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. दरम्यान त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन एका म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हटके पद्धतीने उत्तर दिले. ती म्हण होती ‘देर आये दुरुस्त आए’. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'ज्यांना यायचे होते ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते.' त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाले. अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर सुबोध भावेने वाहवा अशी प्रतिक्रिया दिली, तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.

दरम्यान अमृता यांच्या बोलण्याचा रोख एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, असा अंदाज वर्तवला जात असून त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

बातम्या आणखी आहेत...