आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने तिचा पती आणि अभिनेता हिंमाशू मल्होत्राने सोशल मीडियावर एक प्रेमळ पोस्ट लिहून अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोदेखील शेअर केले आहेत.
हिमांशूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''हॅपीएस्ट बर्थडे अमू.. तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहेस, माझ्या आयुष्यात तुझे असणे हे मजा, मस्ती, सकारात्मकता, निर्भयता आणि जीवनाकडे एक नवीन दृष्टीकोन भरणारे आहे. तुझ्या रुपात मी नेहमीच नवीन रूपात जगाकडे पाहतो आणि प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकतो. गेल्या 10 महिन्यांपासून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी चाललेली धडपड मी बघतोय. मी प्रार्थना करतो की तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवा. तुला खूप खूप प्रेम.''
2015 मध्ये अडकले लग्नगाठीत
अमृता हिमांशूसोबत 24 जानेवारी 2015 रोजी लग्नगाठीत अडकली. नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. हे दोघेही नच बलिए 7 चे विजेते आहेत. या शोदरम्यान या दोघांनीही आपल्या नात्याविषयी एक खुलासा केला होता. हिमांशूने सांगितल्यानुसार, नऊ वर्षाच्या रिलेशनशिपदरम्यान अमृता आणि हिमांशू यांच्यात इतर कोणत्याही कपलप्रमाणे भांडणे होत असत. त्यामुळे अमृताने हिमांशूसोबतचे नाते तोडले आणि ती दुसऱ्या मुलाला डेट करु लागली होती. पण काही दिवसांनंतर तिला हिमांशुची आठवण यायला लागली आणि ती ते रिलेशनशिप तोडून हिमांशूकडे परतली होती. तर दुसरीकडे, अमृताला जळवण्यासाठी हिमांशूने दुसऱ्या मुलीला किस केले होते. त्यावेळी तो इतका मोठा इश्यू होईल असे वाटले नव्हते. पण नंतर हिमांशूला त्याची चुक कळाली होती आणि त्याने सर्वांसमोर अमृताची माफी मागितली. पण अमृताने हिमांशूबद्दल अजूनही मनात राग असल्याचेही सांगितले होते. ज्या मुलीला हिमांशूने किस केले होते त्या मुलीने अमृताचा सर्वांदेखत अपमानही केला होता पण त्यावेळी हिमांशूने त्यावेळी बाजू घेतली नसल्याची खंत राहील, असे अमृताने सांगितले होते.
पंजाबी कुटुंबाची सून झाली अमृता
अमृताचे लग्न दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत झाले. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पंजाबी पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.