आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि वरुण धवन हे त्रिकुट सध्या त्यांच्या आगामी जुगजुग जियो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. प्रमोशनसाठी काय पण... असे म्हणत या तिघांनी नुकताच चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास केला. झाले असे की, या तिघांनाही प्रमोशनसाठी मराठीतील प्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोहोचायचे होते. मग काय मुंबईतील गर्दी टाळण्यासाठी या तिघांनीही दहिसरपर्यंत मेट्रोने प्रवास करायचे ठरवले. तिघांनीही ही मेट्रोची राईड मस्त एन्जॉय केली.
ही धमाल संपत नाही तोच हे तिघे 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोटभर हसण्यासाठी पोहोचले.
थुकरटवाडीतील विनोदवीरांचा कल्ला पाहून या कलाकारांना हसू आवरेना. मंचावर चाललेल्या धमाल मस्तीचे व्हिडिओज या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर देखील केले.
इतकंच नव्हे तर कसे आहेत मंडळी?, हसताय ना? असं विचारणारा डॉक्टर अनिल कपूरसोबत बोले तो झक्कास म्हणतोय. डॉक्टर निलेश साबळेने अनिल कपूर यांच्यासोबतच एक सुंदर फोटो शेअर करून त्याला "बोले तो झक्कास..." असं कॅप्शन दिलंय.
हा फोटो देखील एकदम झक्कास आला आहे हे त्या फोटोवर प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स आणि लाईक्सच्या वर्षावावरून कळतंय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.