आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी स्टारर ''लकडाऊन बी पॉझिटीव्ह' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट 'लकडाऊन' सांगत आहे.
लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. हा चित्रपट वासू आणि सपना यांच्या कौटुंबिक प्रेमाची गोष्ट आहे हे ट्रेलरमध्ये दिसत आहे. वासू आणि सपनाच्या प्रेम कहाणीत येणारे ट्विस्ट हे गमतीदार आणि हसून लोटपोट करणार असल्याची ग्वाही हा ट्रेलर देतो.
या चित्रपटात तब्ब्ल 15 नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार असून यात संजय मोने, प्रिया बेर्डे हे बऱ्याच कालावधी नंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. मनोरंजन सृष्टीचा सुवर्णकाळ जगलेल्या शुभा खोटे यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून वयाच्या 84 व्या वर्षी सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे. या चित्रपटाची गाणी ही गाजत असून 'बेधुंद मी' हे व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं गाणं हे तरुणाच्या सोशल मीडियावर अकाउंटवर सातत्याने दिसत होत.
येत्या 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून निर्मिती इष्णव मीडियाची आहे.
या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची आहे. केतन महांबरे आणि रवी थोपटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाच छायाचित्रण दिग्दर्शन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.