आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या चित्रपटाचा मुहूर्त:मोठ्या पडद्यावर झळकणार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीची जोडी, 'हा' आहे चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

‘लॉकडाउन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण ‘लॉकडाउन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाउन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा . 2020 जर ‘लॉकडाउन’ असेल तर 2021 ‘लक डाउन’ असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे, ज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी.

इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित ‘लक डाउन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

माजी आमदार श्री. शरद दादा सोनावणे (शिवजन्म भूमी), सत्यशील शेरकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना गणेश कवडे युवासेना अध्यक्ष नगर अध्यक्ष श्री. श्याम पांड्ये (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते हे यावेळी उपस्थित होते.

लॉकडाउनमुळे 2020 वर्ष जरी टेन्शनमध्ये गेलं असलं तरी पुढील येणारं वर्ष सर्वांसाठी आनंदी आणि मजेशीर असेल कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘लक डाऊन’ येतोय तुमच्या भेटीला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser