आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अंकुश चौधरी स्पेशल'!:'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर येणार अंकुश चौधरी, रोमँटिक गाण्यांवर स्पर्धक करणार सादरीकरण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतेय. पूजा सावंत आणि धर्मेश सर या परीक्षकांसह अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होऊन स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसतात. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमात पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे.

येत्या 11-12 जानेवारीला 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर सुपरस्टार अंकुश चौधरी येणार असून आठवड्याचा विषय प्रेमाची गाणी हा असणार आहे. स्पर्धक रोमँटिक गाण्यांवर बहारदार परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळे हा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...