आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवर गाजत असलेली अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे. तिला कलेक्टर होण्यासाठी मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. आणि या खास सीनसाठी दोन दिग्गज व्यक्तिमत्त्व पहिल्यांदात मालिकेत एकत्र झळकणार आहेत.
ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर प्रथमच खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे दोन्ही दिग्गज मालिकेत अप्पी अर्थातच अपर्णा सुरेश माने हिचा इंटरव्ह्यू घेताना दिसणार आहेत.
ही आहे अप्पीची संघर्ष कथा
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी ही मुलगी ग्रामीण भागात राहाते. या गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचे ध्येय खूप मोठे आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. या संघर्षात तिचे वडील, नवरा अर्जुन, भाऊ दप्या तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिले.
आता अप्पी कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.