आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे स्पेशल:आशा भोसले यांचे वयाच्या 88 व्या वर्षात पदार्पण, म्हणाल्या - हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खूप खास, आशीर्वाद घेण्यासाठी लता दीदींना फोन करेल

उमेश कुमार उपाध्याय, मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला.

मेलडी क्वीन आशा भोसले यांनी आज वयाची 87 वर्षे पूर्ण केली आहे. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. या खास दिवसाचे औचित्य साधत दिव्य मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसाशी संबंधित आठवणी सांगितल्या आहेत.

आशा भोसले म्हणाल्या, 'वाढदिवशी लोकांचे खूप प्रेम मिळते. वाढदिवस तर असतोच, पण मी यादिवशीही काम करत असते. या वयात चालते-फिरते, काम करते, गाणी गाते, प्रोग्राम करते. या सर्वांसाठी मी देवाचे आभार मानते.'

  • 'मला लोकांसाठी काही करायचे आहे'

'लोकांकडून मला खूप प्रेम मिळाले आहे, मला आता त्यांच्यासाठी काही करायचे आहे. जगभरात अशा अनेक मुली, आई आणि पत्नी आहेत, ज्यांना गाण्याची इच्छा आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे. मी लोकांना त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ मागितले आहे. ज्या दिवशी मी लोकांना विनंती केली, तेव्हा 150 लोकांचे व्हिडिओ आले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. हे व्हिडिओ ऐकण्यात आणि त्यातील चांगले आवाज शोधून काढण्यात माझी सून मला मदत करतेय.'

  • 27 सप्टेंबर रोजी आहे फायनल

'आम्ही या कॅटेगरीत वर्गीकरण करीत आहोत. अंतिम 27 सप्टेंबर रोजी आहे. फायनलिस्टला माझ्याकडून मी एक लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे.'

  • संपूर्ण महिनाभर सेलिब्रेशन सुरु असते

आशा भोसले म्हणाल्या, '7 सप्टेंबर ही माझी मोठी बहीण मीना ताईचा वाढदिवस असतो. त्यानंतर 8 तारखेला माझा आणि 28 सप्टेंबरला लता दीदींचा वाढदिवस असतो. अशा प्रकारे हा संपूर्ण महिना आमच्यासाठी खूप खास आहे.'

  • दीदीला फोन करुन त्यांचा आशीर्वाद घेईल

आपल्या वाढदिवसाच्या तयारीसंदर्भात त्या म्हणाले, 'यावेळी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस अगोदरच माझी नात मला म्हणाली की, आज संध्याकाळपासून तू काहीही करु नको, स्वयंपाक करु नको, छानशी साडी नेस. माझ्या वाढदिवशी ती काय करणार आहे हे मला आता माहित नाही. वाढदिवशी प्रत्येकाचा कॉल येतो. लता दीदींशी बोलणे होतच राहते. त्यांचाही फोन येतो. वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी दीदींना फोन करेल.'

बातम्या आणखी आहेत...