आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेतने वेगळ्याच क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
खरं तर अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांची मुलंदेखील याच क्षेत्राची करिअर म्हणून निवड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर अशोक सराफ यांचे जवळचे मित्र दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, अभिनेते सचिन यांची मुलगी श्रिया पिळगांवकर आणि महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठेरे यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
पण अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ याने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट चोखाळली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे हे वेगळे क्षेत्र निवडून अनिकेतने आई निवेदिता सराफ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. कोणत्या क्षेत्रात अनिकेतने करिअर केले आहे, जाणून घेऊयात याविषयी खास या पॅकेजमधून...
अभिनेता नव्हे तर शेफ आहे अनिकेत सराफ
अनिकेत सराफ एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत.
आईचे स्वप्न केले पूर्ण
एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी सांगितले होते की, मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी स्वप्नपुर्ती केली आहे. वडील अशोक सराफ यांना अनिकेतच्या हातच्या ब्राऊनी खूप आवडतात. तर आई निवेदिताला अनिकेतने बनवलेला मार्बल केक आवडतो.
सोशल मीडियावर अॅक्टिव आहे अनिकेत
अनिकेत सोशल मीडियावर अॅक्टिव असून वेगवेगळ्या डिश बनवतानाचे अनेक फोटोज त्याने शेअर केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.