आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे 'मामा':अशोक-निवेदिता सराफ यांच्यात आहे 18 वर्षांचे अंतर, 'मामां'चा 'दोन्ही घरचा पाहुणा' सिनेमा रिलीज झाला तेव्हा अवघ्या 6 वर्षांच्या होत्या निवेदिता

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहेत. 4 जून 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशोक सराफ यांनी फिल्मी करिअरमध्ये अडीचेशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. अगदी विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. हिंदी सिनेमे, मालिकांमध्येही ते रमले. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते कायम लांब राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाहीये.

पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत अशोक सराफ
अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अशोक सराफ त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 18 वर्षांनी मोठे असल्याचे फार जणांना ठाऊक नसावे. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे.

...तेव्हा सहा वर्षांच्या होत्या निवेदिता
विशेष म्हणजे 1971 साली अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे होते. तर निवेदिता सराफ 1971 साली केवळ सहा वर्षांच्या होत्या. पुढे सिनेसृष्टीत एकत्र काम करत असताना निवेदिता आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.

मुलासोबत अशोक आणि निवेदिता सराफ
मुलासोबत अशोक आणि निवेदिता सराफ

गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण
निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध मंगेश मंदिरात झाले होते. गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून 7 कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. येथेच हे मंदिर आहे. यामागचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर मोठी आस्था आहे. तर मंगेशी हे त्यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करण्याचा अशोक सराफ यांनी निर्णय घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...