आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रेक्षकांसाठी ट्रीट:अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रवास’ आता ओटीटीवर, अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार चित्रपट  

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी चित्रपट, मालिका, वेबसीरिज पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपट, मालिकांची मेजवानी मिळत आहे. यातच आता अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा 'प्रवास' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘प्रवास’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच हा चित्रपट आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी केला आहे.

सरळमार्गी आयुष्य जगणारे इनामदार (अशोक सराफ) वयाच्या एका टप्प्यावर एक निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयाचा सहाजिकच त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होतो आणि संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटात अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर हे कलाकारही झळकले आहेत.