आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हात आपुलकीचा:अश्विनी भावे यांनी रंगकर्मींना दिला मदतीचा हात, 20 लाखांची केली मदत; प्रशांत दामलेंनी मानले आभार  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अश्विनी भावे यांनी एकूण 20 लाख रुपयांची मदत केली आहे.

आजच्या काळात मदत ही संकल्पना म्हणजे माझा काय फायदा? तो होणार असेल तर देईन अशी प्रवृत्ती पाहायला मिळत असताना केवळ एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या उपक्रमावर आणि ग्रुपमधील व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवून अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आर्थिक मदत केली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांचे आभार मानले आहेत. 

अश्विनी भावे यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला पाच लाख रुपये मदत म्हणून दिली आहे आणि त्यांनी यापुढील तीन महिने अशाच पद्धतीने मदत करण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच एकूण 20 लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे

समस्त मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील 200 कलाकार अश्विनी भावे ह्यांचे ऋणी आहेत, असे प्रशांत दामले म्हणाले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...