आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ पहिल्यांदाच बोलणार:'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर हा VIDEO तुम्ही पाहिलात का!

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा'चा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये. 'मुलगी झाली हो' मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. 'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेली दोन वर्षे दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. 'आता होऊ दे धिंगाणा'मुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे.

ढोल ताश्यांच्या गजरात माऊची एन्ट्री होणार आहे. खरंतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहे. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.

'आता होऊ दे धिंगाणा'चा हा खास भाग येत्या शनिवारी रात्री 9 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...