आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझी तुझी रेशीमगाठ':अभिनेता श्रेयस तळपदेसाठी 'या' कारणासाठी ऑगस्ट महिना आहे खूप खास

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका 23 ऑगस्ट पासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेचे प्रोमोज तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी टेलिव्हिजवर पदार्पण करतेय. या दोघांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यामुळे चाहते प्रेक्षक यांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही मालिका 23 ऑगस्ट पासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ऑगस्ट महिना हा श्रेयस साठी खूप खास आहे अशा भावना त्याने व्यक्त केली. त्याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "16 वर्षांपूर्वी इक्बाल हा माझा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला जो माझ्या कारकिर्दीत एक माईलस्टोन ठरला आणि मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही वर्षांपूर्वी मी प्रोड्युस केलेला पोश्टर बॉईझ देखील याच महिन्यात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. आता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक अनोखी प्रेम कथा आहे आणि या मालिकेला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे."

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे.

मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "मी मायरा सोबत रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते, ती सेट वर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं कि मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की मी तिला एक दिवस सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे."

बातम्या आणखी आहेत...