आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. हिंदी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. अलीकडेच गायिका कार्तिकी गायकवाड, सई लोकूर या लग्नाच्या बेडीत अडकल्या. आता 'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळकर हिचेदेखील दोनाचे चार हात झाले आहेत.
शाश्वतीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या लग्नसोहळ्याला मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.
राजेंद्र करमरकर हे शाश्वतीच्या पतीचे नाव असून व्यवसायाने तो फोटोग्राफर आहे.
शाश्वती 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' या मालिकेतून घराघरात पोहोचली. याशिवाय ती चाहुल, सिंधू या मालिकांमध्येही झळकली.
रवी जाधव यांच्या 'बालक पालक' या चित्रपटातून शाश्वतीने मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. देहभान या नाटकातही तिने काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.