आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मातीला अटक:बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित 'बाळकडू' चित्रपटाची निर्मिती करणा-या स्वप्ना पाटकरला अटक, खोटी निघाली पीएचडीची डिग्री

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वप्नावर खोटी पीएचडी पदवी दाखवून रुग्णालयात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माती स्वप्ना पाटकर (39) हिला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. स्वप्नाने क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली पीएचडीची पदवी खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्वप्नावर खोटी पीएचडी पदवी दाखवून रुग्णालयात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची केली होती निर्माती
स्वप्ना एक निर्माती असून तिने शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. 'बाळकडू' हे त्या चित्रपटाचे नाव आहे. स्वप्ना 2016 पासून वांद्रे येथील एका नामांकित इस्पितळात सहाय्यक मनोवैज्ञानिक तज्ज्ञ म्हणून काम करत होती.

मागील महिन्यात दाखल झाली होती तक्रार
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाविरुद्ध 26 मे रोजी मुंबईतील वांद्रे येथे तक्रार नोंदवण्यात आली असून तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. 51 वर्षीय सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर सिंग यांना एप्रिल महिन्यात त्यांच्या कार्यालयात एक सीलबंद लिफाफा मिळाला. यात स्वप्नाच्या पीएचडी संबंधित काही कागदपत्र होते. ते पाहून गुरदीप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या कागदपत्रांनुसार स्वप्नाने दाखवलेली छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय, कानपुर येथील डिग्री खोटी होती. या डिग्रीचा वापर करून स्वप्नाने रुग्णालयात नोकरी मिळवली होती. इतकंच नाही तर ती मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार देखील करत होती. तिच्याविरोधात भांदवी कलम 419, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...