आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेलं दोन वर्ष अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेचे शिर्षकगीत अजूनही घराघरांत तितकंच लोकप्रिय आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे 800 हून अधिक भाग पूर्ण झाले असून, आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या मालिकेचे शिर्षकगीत एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जो अजूनही कायम आहे.
अगदी पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाणं सोपे नाही, यामध्ये संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मालिकेचं नव्या ढंगातलं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
या मालिकेतून बाळूमामाच्या अजुन सुरस कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.